शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार मंगळवारी पिंपरी चिंचवड शहर दौरा करणार असल्याची बातमी आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शरद पवार गट व अजित पवार गट असे दोन गट निर्माण झाले आहे .शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामटे यांनी पक्ष संघटने च्या वाढीकरिता कंबर कसली आहे. शहरातील अनेक नेतेमंडळी त्यांच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे यातच आमदार रोहित पवार यांचा सातत्याने पिंपरी चिंचवड शहराकडे दौरे सुरू असून त्यांनी आपले संपूर्ण लक्ष पिंपरी चिंचवड शहरावर केंद्रित केल्याचे दिसत आहे.
मंगळवारी रोहित पवार हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची भेट घेणार असून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी काळात पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गट व शरद पवार गट या दोन्ही राष्ट्रवादीच्या गटांमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहावयास मिळणार आहे.