शबनम न्युज | लातूर (वृत्तसंस्था)
लातूर शहरातील इस्लामपुरातावरजा कॉलनी परिसरात फुग्यांमध्ये हवा भरताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामध्ये फुगे विक्रेता जागीच ठार झाला असून, अकरा लहान मुले गंभीर जखमी झाली आहेत. ही घटना रविवार (दि.15 ) ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली असून, जखमींना लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवारी सायंकाळी 6 वाजेदरम्यान फुगे विकणारा सिलेंडरच्या मदतीने फुग्यांमध्ये हवा भरत होता, त्याच्याभोवतीला दहा ते पंधरा मुलांचा घोळका होता. त्याचवेळी अचानक स्फोट झाला, त्यात फुगेवाले रामा नामदेव इंगळे (वय 50 )हे जागेच ठार झाले, यात 11 मुले जखमी झाली असून, त्यातील दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Advertisement