शबनम न्युज | पिंपरी
तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध सेवा व सुविधेबाबत माहिती देण्यासाठी व त्यांच्या समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष सुरू केला आहे. विश्रांतवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त कार्यालयात कक्ष उभारण्यात आलेला आहे.
जिल्हास्तरावर तृतीय पंथ व्यक्तींच्या समस्या व तक्रारींची निवारण करणे, यासाठी राज्य शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, महाविद्यालयांशी संपर्क साधून तृतीय पंथीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक समस्या सोडविणे, वेळोवेळी दिलेल्या सूचनांबाबत माहिती देण्यासाठी हा कक्ष सुरू करण्यात आला आहे.
Advertisement