शबनम न्यूज | प्रतिनिधी :
थेरगाव,पुणे : जगामध्ये झपाट्याने लोकप्रिय होत असलेल्या ‘पिकलबॉल’ या खेळाची पुण्यातील पहिली स्पर्धा दि. १४ आणि १५ ऑक्टोबर २०२३ रो जी ‘क्रिकफिटनेट अकॅडमी‘,थेरगाव येथे आयोजित करण्यात आली होती.ठाकरे पिकलबॉल अकॅडमी,ग्लायडर्झ आणि अनेक संस्थांच्या सहकार्याने ही टूर् नामेंट पार पडली. १५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी राष्ट्रीय खेळाडू वृषाली ठाकरे आणि मान्यवरांच्या पारितोषिक वितरण करण्यात आले.अजय चौधरी,सई पारकर,विक्रम भोसले आदी उपस्थित होते.’प्लेयर ऑफ टूर्नामेंट’ अवॉर्ड सई पारकरला देण्यात आले.
‘ग्लायडर्झ’ चे प्रॉडक्ट डिझायनर ‘ग्लायडर्झ स्पोर्ट्स इक्वि पमेंट प्रा. लि.‘च्या प्रमोटर अपूर्वा कुलकर्णी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित सत्तू यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.वेगवेगळ्या वयोगटात महिला आणि पुरुषांची ही स्पर्धा झाल्या.त्यात डबल,मिक्स डबल असे गट होत्या.५० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले .रविवारी सायंकाळी ५ ते ७ या वेळात अंतिम सामने झाले.
‘ग्लायडर्झ’ चे प्रॉडक्ट डिझायनर दीप उपाध्ये म्हणाले,’खेळांना लागणारे साहित्य आणि सामग्री भारतात तयार झाली तरच खेळाडूंना अधिक चांगल्या भावनेने खेळता येईल आणि आत्मनिर्भर भारत संकल्पना साकारता येईल’.राकेश निगुडकर म्हणाले,’पुण्यातील पहिल्या स्पर्धेचा प्रतिसाद उत्साहवर्धक होता.पुढे या खेळाची चांगली वाढ होईल,हे दिसून आले.’हर्षद भुंजे म्हणाले,’या खेळाला लागणारे उच्च दर्जाचे बॉल भारतात निर्माण करणे हे आव्हान होते.मात्र,त्यात यश मिळाल्याने खेळाची रंगत वाढली आहे.’