शबनम न्यूज | प्रतिनिधी | पिंपरी चिंचवड
मोशी : पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरातील एस के गार्डन सोसायटी मध्ये मागील दोन वर्षापासून वीज संदर्भातील अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या, वारंवार वीज खंडित होणे त्यामुळे उद्भवणाऱ्या समस्या या अडचणींचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता. नागरिकांनी वारंवार महावितरण कार्यालयात याबाबत पाठपुरावा करूनही त्यांची समस्या सोडविली गेली नाही, सदर सोसायटीतील वीज केबल खराब असल्यामुळे सोसायटी चा वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता, याबाबत नागरिकांनी वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रार केली परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी तात्पुरत्या स्वरूपात समस्यांचे निराकरण केले परंतु येथील नागरिकांना दर दोन ते तीन दिवसात वीज खंडित होण्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत होते शेवटी या सर्व नागरिकांनी या परिसरातील माजी नगरसेवक वसंत बोराटे यांच्याकडे आपली समस्या मांडली,त्यानंतर दोनच दिवसात वसंत बोराटे यांनी स्वखर्चाने वीज केबल उपलब्ध करून दिली व स्वतः उभे राहून सदरचे काम पूर्ण करून घेतले.
नगरसेवक वसंत बोराटे यांनी त्यांच्या समस्यांचे निराकरण स्वखर्चाने नवीन केबल विद्युत कामासाठी उपलब्ध करून देऊन मोशी परिसरातील या सोसायटी धारकांचा वीज पुरवठा खंडित होणाऱ्या समस्येचे निराकरण करण्याचे काम अति गतिशील पणे केल्याने या सर्व नागरिकांनी वसंत बोराटे यांचे शतशः आभार व्यक्त केले.
वसंत बोराटे यांच्या माध्यमातून एस के गार्डन सोसायटी मधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे त्यांचा बीज खंडित होणारा प्रश्न हा कायमचा सुटला याबाबत आपल्या प्रतिक्रिया देताना नागरिकांनी वसंत बोराडे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहे या सोसायटीमधील काही नागरिकांच्या प्रतिक्रिया पुढील प्रमाणे मधुकर बाबुराव देशमुख (एस के गार्डन सोसायटी नागरिक) - आमच्या येथे मागील २ वर्षांपासून MSCB च्या पवार सप्लाय चा प्रॉब्लेम आहे. आमच्या DP मध्ये कालांतराने १ फेज निकामी झाला त्यामुळे दोन फेजवर संपूर्ण लोड आला त्यामुळे त्यामधील हि आजून १ फेज निकामी झाला. हे असे झाल्यामुळे सध्या एकाच फेजवरून विद्युत पुरवठा होत होता. तीन फेजचा लोड एकाच फेजवर आल्यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत होता. त्यामुळे आम्ही नगरसेवक वसंत बोराटे यांना आमची समस्या सांगितली, त्यानंतर त्यांनी हे २ वर्षांपासून रखडलेल्या विदुतपुरवठ्याचा प्रश्न आमच्या नगरसेवकांनी २ दिवसात मार्गी लावला. जितेंद्र परदेशी ( एस के गार्डन सोसायटी नागरिक) - वसंतशेठ यांना आमची समस्या सांगताच त्यांनी दोनच दिवसांतच समस्येचे निवारण केले त्यामुळे त्यांचे आभार.