शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुढाकाराने दापोडी येथील जनता शिक्षण संस्थेच्या श्रीमती सी.के.गोयल कला व वाणिज्य महाविद्यालय येथे तरुण तरुणांसाठी गुणवत्तापूर्ण उद्योग, कौशल्य व नोकरीची संधी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. लाईट हाऊस या संस्थेमार्फत विविध कौशल्यावर आधारित प्रशिक्षण दिले जाते. युवकांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. त्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
या वेळी राष्ट्रवादीचे युवक शहराध्यक्ष शेखर काटे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर, शहर कार्याध्यक्ष प्रसाद कोलते, तुषार ताम्हाणे, प्राचार्य सुभाष सूर्यवंशी, प्राध्यापक सिद्धार्थ कांबळे, जनता शिक्षण संस्था पुणेचे कार्याध्यक्ष वाय. जी. कांबळे, शिक्षक मा. सुजाता शेंडगे, क्षितिजा देशमुख, श्रावणी चितारे, पदाधिकारी मा. रोहित काटे, मा. कांबळे, मा. कुमार अडागळे, मा. सायली शिंदे, मा. कुणाल सोनवणे, मा.साहिल माने, मा. गणेश आटोळे, मा. कुणाल सोनिग्रा, मा. वसीम शेख आदी या वेळी उपस्थित होते.
युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हा उपक्रम राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. लाईट हाऊस मार्फत विविध कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाते. नोकरीसाठी प्रयत्न केले जातात. युवकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी हा उपक्रम राष्ट्रवादी युवकच्या वतीने आयोजित करण्यात आला. ‘‘लाईट हाऊस’’च्या माध्यमातून युवकांना सक्षम करण्याचा आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे.