शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
दोन वर्षांपूर्वी राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला होता त्यावेळेस मीच उद्धव ठाकरेंचा हात धरत हेच मुख्यमंत्री होतील असे आमदारांच्या बैठकीत सांगितले होते. अशी माहिती आज पिंपरी- चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी दिली.
Advertisement
सुरवातीला उद्धव ठाकरे नेतृत्व करण्यास तयार नव्हते. मुख्यमंत्री पदास त्यांनी नकार दिला होता. पण आपल्या जुन्या मित्राच्या चिरंजीवाला संधी द्यावी म्हणून मी उद्धव ठाकरेंचा हात वर केला. त्यावेळी राज्यात आघाडी सरकार बनवण्यात माझाही सहभाग होता, असे यावेळी शरद पवार म्हणाले.
Advertisement