शबनम न्युज | दिल्ली
आगामी काळात होणाऱ्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु आहे.
या बैठकीत नवीन अध्यक्षपदाबाबत चर्चा होण्याची शक्यता होती. त्यानुसार राहुल गांधींना पुन्हा एकदा पद पक्षाध्यक्ष पद स्वीकारण्याची विनंती करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. त्यावर राहुल गांधींनी सकारात्मक प्रतिक्रिया दिल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच पक्षाच्या नेत्यांकडून विचारधारेच्या पातळीवर स्पष्टता हवी असल्याचे देखील त्यांनी यावेळी बोलून दाखवलं आहे.
या बैठकीत राहुल गांधी, सोनिया गांधी, अशोक गहलोत, आनंद शर्मा यांच्यासह इतर पक्षाचे 52 वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित आहेत.
येत्या 1 नोव्हेंबरपासून काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकांची प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. राहुल गांधी हे लवकरच पक्षाध्यक्ष पद स्वीकारतील असेही काही नेत्यांनी सांगितले आहे.