शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनी याठिकाणी सुरू असलेल्या रस्ता डांबरीकरणाच्या कामाची पाहणी केली .
पिंपळे सौदागर मधील विश्वशांती कॉलनी याठिकाणी बऱ्याच काळापासून रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम रखडले होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याशी संपर्क करून याबाबत माहिती दिली आणि लवकरात लवकर सदर रस्त्याचे डांबरीकरण करण्याची मागणी केली. मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी स्थानिक नागरिकांच्या या मागणीची दखल घेत संबंधित पालिका विभागाला विश्वशांती कॉलनी येथील रस्त्याचे डांबरीकरण करण्याच्या सुचना दिल्या होत्या.सूचनांची दखल घेत पिंपळे सौदागर येथील विश्वशांती कॉलनी याठिकाणी रस्ता डांबरीकरण काम सुरू करण्यात आले आहे.
Advertisement