शबनम न्यूज , प्रतिनिधी :
निवडणुकांचे वारे सध्या जोरात सुरू झाले आहे प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या संघटना मजबूत करण्यावर भर देत आहे. पिंपरी चिंचवड शहरातही लोकसभेचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. तसेच प्रत्येक राजकीय पक्ष आपापली ताकद वाढविण्यासाठी समाज माध्यमांचा प्रभावीपणे उपयोग करून घेत आहे याचेच प्रत्यय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संदर्भात सध्या येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेना प्रमुख पदी युवा नेते चेतन पवार यांची निवड झाली या निवडीनंतर चेतन पवार यांनी शिवसेनेच्या संघटन बांधणीला शहरांमध्ये वेग दिला.याचाच एक महत्वाचा भाग म्हणून महत्त्वपूर्ण घडामोडी आणि संघटनेच्या दिशा वेळोवेळी युवासैनिकांना कळत रहाव्या या उद्देशाने शिवसेना युवासेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पिंपरी चिंचवड शहरच्या अधिकृत फेसबुक पेज चे अनावरण युवासेना सचिव . वरुणजी सरदेसाई यांच्या हस्ते नुकतेच मुंबई येथे करण्यात आले. यावेळी त्यांनी युवासेना येत्या काळात शहर आणि राज्यात नक्कीच भरारी घेईल असा विश्वास व्यक्त केला. शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यावेळी उपस्थित होते.