शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ फेब्रुवारी) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी महासंघाची निवडणूक 25 तारखेला पार पडली या निवडणुकीचा निकाल 18 तास चाललेल्या मतमोजणीनंतर लागला असून समोर आलेल्या निकालानुसार या निवडणुकीत स्वर्गीय शंकर (अण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे पदाधिकारी निवडून आले आहेत. या निवडणुकीत कर्मचारी महासंघाचे प्रमुख शशिकांत (बबनराव ) झिंजुर्डे यांचा विजय झाला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांना आपली प्रतिक्रिया देताना शशिकांत (बबनराव) झिंजुर्डे यांनी सांगितले की मागील दोन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत माझ्यावर चुकीच्या पद्धतीने आरोप करीत विरोधी पक्षाला विजय मिळाले होते परंतु मागील दोन वर्षात कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले व हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठीच कर्मचाऱ्यांनी मला कौल दिला आहे कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी तसेच वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यासाठी स्व. शंकर (अण्णा) गावडे कर्मचारी महासंघ पॅनलचे सर्व पदाधिकारी शासन दरबारी प्रयत्न करतील असे यावेळी शशिकांत (बबनराव झिंजुर्डे) यांनी विजयानंतर सांगितले.