शबनम न्यूज . प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील प्रेस ५ या ड्राय क्लीन शॉपमध्ये अचानक आग लागली या आगीने रौद्ररूप धारण करण्या आधीच आग लागल्याचे या परिसरातील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना कळले त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला सदर घटनेची माहिती दिली व त्वरित आग वीजविण्या साठी योग्य ती कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश दिले ,
नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशन सदस्य हि तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ते कार्यवाही सुरू केली .या आगीत किती नुकसान झाले या बाबत ची माहिती अद्याप मिळाली नसून आगीवर पुर्ण नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असून आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.
Advertisement