शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर जिल्हा विद्यार्थी संवाद सायकल दौरा समाप्ती समारोह ग दि माडगूळकर सभागृह प्राधिकरण निगडी येथे संपन्न झाला,
या वेळी महात्मा फुले कॉलेज पिंपरी आकुर्डी डी वाय कॉलेज रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी आय बी एम आर कॉलेज,बाजली लॉ कॉलेज ताथवडे तसेच चिंचवड विधानसभा,भोसरी विधानसभा असे एकुण 40 जणांची कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री सुनीलदादा गव्हाणे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रानभाई शेख, विद्यार्थी अध्यक्ष श्री राहुल आहेर,ओबीसी शहराध्यक्ष भाई विशाल जाधव,युवा नेते संदीपभाऊ चव्हाण,कार्याध्यक्ष सागरभाऊ तापकीर सचिनभाऊ निंबाळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
सुनील गव्हाणे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना त्यांच्या येणाऱ्या अडचणी समजून सांगितल्या आणि त्यांच्याकडून देखील समजून घेतल्या आणि त्या कशा सोडवाव्यात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून ते आपणास पूर्णपणे त्या ठिकाणी मदत केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली आणि गेली महिनाभर झालेल्या संवाद यात्रेसाठी केलेल्या मेहनतीचे कौतुक देखील केले.
युवक शहराध्यक्ष इम्रानभाई शेख म्हणाले की आज तुम्ही महिना भरात एवढे मोठे संघटन उभ करू शकता तर येणाऱ्या काळात नक्कीच हजार लोकांचा संघटन तुम्ही कराल असा विश्र्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी शहराध्यक्ष राहुल आहेर व त्यांच्या सहकऱ्यांचे कौतुक केले.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री राहुल आहेर यांनी सायकल दौरा करत असताना महिना भरात विद्यार्थ्यांशी संवाद कसा साधला त्या बाबत काय अनुभव आला हा सुनीलदादा गव्हाणे यांना सांगण्यात आला आणि विद्यार्थ्यांना शब्द दिला की तुमच्या कॉलेज च्या बाबतीत येणाऱ्या प्रत्येक अडचण सोडवण्याच काम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर नक्की करेल कारण राज्याचं नेतृत्व आपल्या भागात आहे ते आपल्याला वेळोवेळी मदत करण्याचा प्रयत्न करतात.
ओबीसी सेलचे शहराध्यक्ष यांनी त्यांच्या विद्यार्थी दशेतील अनुभव या ठिकाणी व्यक्त केला व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले युवा नेते संदीप भाऊ चव्हाण यांनी देखील सर्वतोपरी मदत करण्याचे आव्हान या ठिकाणी केले आणि त्याबाबतची ग्वाही विद्यार्थ्यांना दिली.
वरील सर्व मान्यवरांनी नव नियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रवक्ते श्री राहुल नेवाळे यानी केले.चैतन्य बनकर,वैष्णवी पवार,प्रतीक्षा पठारे,अभिषेक कांबळे,या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या वेळी तुषार गाडे,ऋषभ भडाळे ज्ञानेश्वर पुदाले चैतन्य बनकर सुरज परमार अभिषेक कांबळे,ऋतिक गायकवाड,अनुष्का काळभोर अंकिता नाटेकर सिद्धी माळी विश्वा लोंढे नितीन मोरे संतोष माळी,हर्षद परमार,अक्षय शेडगे,योगेश देशमुख,फैजल तांबोळी,आणि दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.