शबनम न्युज | पिंपरी
वायु प्रदूषण हे सगळ्यांसाठीच घातक आहे. या संदर्भात न्यायालयाने आणि शासनाने जे निर्देश दिले आहेत त्यांचे तंतोतंत पालन विविध ठिकाणी केले जात असले तरी दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा वायु प्रदूषणाने डोके वर काढले आहे. पिंपरी- चिंचवड शहरातील हवामान शुद्ध कसे राहील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत तसेच वायू प्रदूषण ज्या- ज्या माध्यमातून होत आहे, त्या माध्यमांचा वापर कमीत कमी करण्याचे आवाहन पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले आहे.
यावेळी महानगरपालिका अधिकारी किरण गायकवाड म्हणाले, वायु प्रदूषण संदर्भात न्यायालयाने आणि सरकारने जे निर्देश दिलेले आहेत त्याप्रमाणे महानगरपालिका कारवाई करत आहे. महानगरपालिका प्रभाग निहाय वायु प्रदूषण नियंत्रण पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकांमार्फत वेगवेगळ्या ठिकाणी पाहणी करून नियमांचे पालन केले जात आहे का? हे पाहिले जात आहे. नियमांची पायमल्ली केल्यास दंडात्मक कारवाई केली जात आहे.