शबनम न्युज | पुणे
राज्यात सुरू असणाऱ्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांनी स्पष्टपणे भाष्य केले आहे. त्याचबरोबर पवार यांचा ओबीसी जात प्रमाणपत्राचा दाखला सोशल मीडियावर व्हायरल होतोय, त्यावरही त्यांनी खुलासा दिला.
‘मी हा दाखला पाहिला, तो खरा असला तरी काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला आहे. माझी जात कोणती आहे हे सर्वांना माहिती आहे, असं सांगत मी कधी जातीचं राजकारण केलं नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट शब्द सांगितले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा माझा दाखला मी पाहिला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये शिकायला होतो. तो दाखला आहे. त्या गोष्टी खऱ्या आहेत, पण काही लोकांनी दुसरा दाखला फिरवला. त्यात माझ्यापुढे ओबीसी लिहिलय. ओबीसी समाजाबद्दल माझ्या मनात आस्था आहे. पण जन्माने माझी जात कोणती आहे, हे सर्वांना माहिती आहे. परंतु जातीवरून मी राजकारण आणि समाजकारण केलं नाही आणि करणारही नाही. पण हा वादग्रस्त मुद्दा सोडवण्यासाठी माझ्याकडून जो काही हातभार लावता येईल, तो मी लावेल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.