शबनम न्युज | चिखली
दिवाळी सणानिमित्त मोठ्या प्रमाणात धामधूम असल्याने महिला व नागरिक हे बाजारामध्ये खरेदीस करण्यासाठी बाहेर पडत असतात. याचा फायदा घेऊन सोनसाखळी चोर हे बाजारामध्ये दागिने घालून आलेल्या महिलेवर नजर ठेवून जबरदस्तीने दागिने ओढून जबरी चोरी करतात. अशाच सोनसाखळी चोरणाऱ्या गुन्हेगारास चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
महिला रुचिता गौरव महाजन (वय 24, रा. पुणे) यांनी फिर्याद दिली असता, रोहित दशरथ गावडे (वय 23, रा. जाधव वाडी, चिखली पुणे) यास चिखली पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्या असता, आरोपी याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. फिर्यादी यांनी सदर इसमाविरोधात चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता, त्याच्याविरोधात भादवि कलम 392 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास केला असता, आरोपी रोहित गावडे याने सदर जबरी चोरी केल्या असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला अटक केले असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरी केलेले सोन्याचे मंगळसूत्र हस्तगत करण्यात आले. त्याच्याकडून आणखी एक गुन्हा उघडकीस आला.
सदरची कारवाई परिमंडळ विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, भोसरी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विवेक मुंगळीकर, चिखली पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तौफिक सय्यद, सुनील शिंदे, चेतन सावंत, भास्कर तारळकर, दीपक मोहिते, संदीप मासाळ, अमोल साकोरे, विश्वास नानेकर, कबीर पिंजारी, संतोष सपकाळ, गौतम सातपुते यांनी केली.