शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (२२ नोव्हेंबर ) :- MCS विभागाने सरकारच्या नियमांचे अवलंबन न करता द्वितीय वर्षाची प्रवेश फी मध्ये भरमसाठ वाढ केली आहे. कोविड-१९ च्या महामारीमुळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या कालखंडात प्रवेश फी संदर्भात सरकारने काही नियम व अटी सर्व विद्यापीठ ,महाविद्यालय यांना घालून दिले आहेत. त्यानुसारच प्रवेश फी आकारणे बंधनकारक आहे.
सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार आपण MCA विभागाची द्वितीय वर्षाची प्रवेश फी आकारण्यासंदर्भात लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी युवासेना विद्यापीठ कक्षाच्या वतीने करण्यात आली.
यावेळी युवासेना विद्यापीठ कक्षाचे अध्यक्ष कुणाल धनवडे ,सरचिटणीस परमेश्वर लाड ,सचिव निखिल येवले ,पिंपरी चिंचवड शहर समन्वयक रुपेश कदम ,भोसरी विधानसभा युवाधिकारी कुणाल जगनाडे , गौरव आसरे , संतोष भोर ,आशिष बाबर ,अरुण जवळगे, अथर्व डांगरे ,पराग जोशी उपस्थित होते .