शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड परिसरात उत्तर भारतीय नागरिक छटपूजा मोठ्या उत्साहात साजरी करतात. या उत्सवानिमित्त पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिरा शेजारील पवना नदीच्या घाटावर देखील नाना काटे सोशल फाउंडेशन व उत्तर भारतीय संघटना यांच्या संयुक्त माने दरवर्षी छटपूजा उत्सव साजरा केला जातो. येत्या 19 तारखेला हा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत माजी नगरसेवक नाना काटे व शितलताई नाना काटे यांनी संबंधित मनपा विभागाला सूचना केल्या होत्या की, सदर घाट स्वच्छ करण्यास सुरुवात करावी, त्याअंतर्गत आज पिंपळे सौदागर येथील महादेव मंदिर जवळील पवना नदी घाट स्वच्छ करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
छटपूजा उत्सवानिमित्त पूर्वतयारी म्हणून या घाटावर नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून घाटाची स्वच्छता करण्यात यावी, अशा सूचना नाना काटे यांच्या वतीने संबंधित मनपा विभागाला देण्यात आल्या होत्या, त्याअंतर्गत आज सदर घाटाची स्वच्छता करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.