शबनम न्युज | अहमदाबाद (वृत्तसंस्था)
आयसीसी एक दिवसीय विश्वचषक हा 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमने सामने आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला त्याची 2011 च्या वर्ल्ड कप ची साईन जर्सी भेट दिली आहे.
1983, 2011 नंतर भारतीय संघाला 12 वर्षांनी पुन्हा वनडे वर्ल्ड कप उंचवण्याची संधी आहे. मागील दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये यजमान संघाने वर्ल्डकप उंचावला आहे आणि यावेळेस हाच पराक्रम पाहण्यासाठी संपूर्ण भारतीय उत्सुक आहेत. पण भारतीय संघासमोर पाच वेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान आहे.
भारत – रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया – ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जॉश इंग्लिस, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.