शबनम न्युज | अहमदाबाद (वृत्तसंस्था)
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने आहेत. हा सामना जिंकून भारतीय संघाला तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याची संधी आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया २००३ मध्ये विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पोहोचले होते, त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर मात केली होती. आता भारतीय सघाकडे या पराभवाचा बदला घेण्याची सुवर्णसंधी आहे.
टीम इंडियाला सर्वात मोठा झटका! अर्धशतकानंतर किंग कोहली क्लीन बोल्ड टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. पॅट कमिन्सने विराट कोहलीला ५४ धावांवर क्लीन बोल्ड केले. सध्या टीम इंडियाची धावसंख्या ४ बाद १४८ धावा झाली आहे.
विराट कोहलीने झळकावले विश्वचषकातील पाचवे अर्धशतक विराट कोहलीने यंदाच्या विश्वचषकात पाचवे अर्धशतक झळकावले आहे. विराटने ५६ चेंडूचा सामना करताना ४ चौकारांच्या मदतीने नाबाद ५० धावांवर खेळत आहे. भारतीय संघाने २६ षटकानंतर ३ बाद १३५ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर केएल राहुल ५८ चेंडूत २८ धावांवर खेळत आहे.
भारताच्या धावांचा वेग मंदावला, ५४ चेंडूत एकही आला नाही चौकार टीम इंडियाच्या धावांचा वेग मंदावला आहे. बऱ्याच कालावधीपासून एकही चौकार आलेला नाही. शेवटचा चौकार ५४ चेंडूंपूर्वी मारला होता. २० षटकांनंतर भारताची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ११५ धावा आहे. विराट कोहली ४० चेंडूत ३९ आणि केएल राहुल ३४ चेंडूत १९ धावांवर खेळत आहेत.
टीम इंडियाचे धावांचे शतक! कोहली आणि राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा
टीम इंडियाला आता विराट कोहली आणि केएल राहुलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. १६ षटकांनंतर स्कोअर ३ बाद १०१ धावा आहे. कोहली ३४ आणि राहुल १० धावांसह खेळत आहेत. विराटने चालू विश्वचषकात ७००हून अधिक धावा केल्या आहेत. सामन्यादरम्यान एक चाहता विराटला भेटण्यासाठी थेट मैदानावर पोहोचला.
१३ षटकांनंतर भारताची धावसंख्या ३ बाद ८९ धावा भारतीय संघाने १३ षटकांत ३ बाद ८९ धावा केल्या आहेत. विराट कोहली २७ आणि केएल राहुल पाच धावांवर नाबाद आहे. भारतीय चाहत्यांना दोन्ही खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
रोहित शर्मा पाठोपाठ श्रेयस अय्यरही बाद, टीम इंडियाला तिसरा झटका श्रेयस अय्यरच्या रूपाने भारताला तिसरा धक्का बसला. ११व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तो पॅव्हेलियनमध्ये परतला. अय्यरला कमिन्सने यष्टिरक्षक जोश इंग्लिशच्या हाती झेलबाद केले. त्याला तीन चेंडूत केवळ चार धावा करता आल्या.
रोहित शर्मा ४७ धावा करून बाद झाला टीम इंडियाला ७६ च्या स्कोअरवर दुसरा धक्का बसला आहे. रोहित शर्मा ४७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रोहितने आपली विकेट गमावली. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर पाठीमागे धावताना ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेतला. रोहितने बाद होण्यापूर्वी ३१ चेंडूत ४७ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ४ चौकार आणि ३ षटकार मारले.
विराट कोहलीची मिचेल स्टार्कच्या षटकांत चौकारांची हॅट्ट्रिक भारताची धावसंख्या ७ षटकांनंतर एक विकेट गमावून ५४ धावा आहे. रोहित शर्मा २२ चेंडूत ३३ धावा करून खेळत आहे. त्याचवेळी नवीन फलंदाज विराट कोहलीने १३ चेंडूंचा सामना केल्यानंतर १६ धावा केल्या आहेत. स्टार्कच्या षटकात किंग कोहलीने पाठीमागे तीन चौकार मारले.
टीम इंडियाने ६ षटकांत केल्या ४० धावा भारताने ६ षटकांनंतर १ गडी गमावून ४० धावा केल्या. रोहित शर्मा २१ चेंडूत ३२ धावा करून खेळत आहे. त्याने दोन षटकार मारले आहेत. विराट ८ चेंडूत ३ धावांवर खेळत आहे.
रोहित शर्माने मोडला ख्रिस गेलचा विक्रम रोहित शर्माने ख्रिस गेलचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम मोडला आहे. ख्रिस गेल ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ षटकार मारले होत, आता रोहित ८६ षटकारांसह ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे.
टीम इंडियाला पहिला धक्का भारतीय संघाला शुबमन गिलच्या रुपाने पहिला धक्का बसला आहे. त्याला मिचेल स्टार्कने ४ धावांवर झाम्पाच्या हाती झेलबाद केले.
भारतीय संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी सज्ज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकली आहे. त्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने सांगितले की, त्याने प्लेइंग इलेल्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. रोहितने सांगितले की, मला प्रथम फलंदाजी करायची होती. ऑस्ट्रेलियन संघातही कोणताही बदल झालेला नाही.
दोन्ही संघांचे राष्ट्रगीत झाल्यानंतर प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात १५ मिनिटांचा एअर शो झाल्यानंतर दोन्ही संघाचे राष्ट्रगीत झाले. यामध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाचे नंतर भारताचे राष्ट्रगीत झाले. आता प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल.
Advertisement