शबनम न्युज | सांगली
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागत मिरवणुकीतील होत असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन पाकीटमारी करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून सुमारे दीड लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. या टोळीने शुक्रवारी झालेल्या जरांगे पाटील यांच्या सांगली दौरा वेळी मोठी हात सफाई केल्याचे पहावयास मिळाले.
शुक्रवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मनोज जरांगे पाटील विटा, सांगली व इस्लामपूर येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेपूर्वी मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी स्वागत मिरवणूक काढली होती. तसेच तासगाव मध्ये ही जंगी स्वागत करण्यात आले होते. यावेळी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या गर्दीचा फायदा घेत अनेक कार्यकर्त्यांच्या खिशातील पैसे लंपास करण्यात आले होते.
याप्रकरणी सुरज उध्दव पवार (वय २७), रमाकांत आनंदा कांबळे (वय ३६), आकाश साहेबराव वाघमारे (वय २४), राजेश विठ्ठल शाहीर (वय ३४), अविनाश लालासाहेब कांबळे (वय २७), दत्ता लालासाहेब कांबळे (वय २८), अक्षय शिवाजी सनमुखराव (वय ३४), विलास लक्ष्मण शिंदे (वय २६ सर्व रा. राजीवनगर, लातुर) आणि बिलाल गुलाब नबी खान (वय ५४ रा. मालेगांव, जि. नाशिक) या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.