शबनम न्यूज, प्रतिनिधी :
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत अजिंक्यपद मिळवलेल्या आणि आपल्या कुस्तीने देशात महाराष्ट्राचा मान वाढवणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पैलवान सिकंदर शेख यांनी आज पिंपरी चिंचवड शहरास भेट दिली. यावेळी त्यांनी पिंपरी चिंचवड शहरातील प्रमुख व्यक्तींच्या घरी सदिच्छा भेट दिली व आशीर्वाद घेतला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहरअध्यक्ष इम्रान शेख यांच्या इंद्रायणी नगर येथील निवासस्थानी देखील सिकंदर शेख यांनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख यांचा सत्कार केला गेला.लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आत्मचरित्र ‘लोक माझे सांगती’ हे पुस्तक तसेच रोख रक्कम देण्यात आली. तसेच येणाऱ्या काळात देखील पैलवान सिकंदर शेख यांना सर्वपतरी मदत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून दिली जाईल अशी ग्वाही युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली.तसेच युवा महाराष्ट्र केसरी किशोर नखाते यांचा देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी यांनी महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख यांच्याबरोबर संवाद साधला तसेच या आपल्या लाडक्या पैलवान सिकंदर शेख बरोबर सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी गर्दी केली होती.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्रान भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष ज्योतीताई निंबाळकर. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश संघटक राहुल पवार, शहर कार्याध्यक्ष सागर तापकीर, उपाध्यक्ष ओम शिरसागर,प्रसिद्ध उद्योजक सुधाकर भोसले,पूजाआल्हाट,
स्वप्नाली असोले, रजनीकांत गायकवाड,केतन होके, अशरफ शेख,दर्शन लांडगे,
शाहिद बागवान, उमर शेख, अनुज देशमुख,साहेबलाल शेख, केतन पूनममीया, अजीम शेख, प्रशांत जाधव सिद्धांत कसबे विजय वाघमारे.राहुल संतोष पवार
जावेद शेख,बाळासाहेब मुके योगेश लांडगे,इरफान भाई शेख आणि मोठ्या संख्येने युवक पदाधिकारी उपस्थित होते.