शबनम न्युज | मुंबई
मुंबईत बहुमजली इमारत मध्ये आज पहाटे भीषण आग लागली. भायखळा पूर्व येथील घोरपड देव विभागातील भाडा संकुलातील न्यू हिंदमिल कंपाऊंडच्या 3 सी या 24 मजली इमारतीला आज आग लागली. आग लागल्यानंतर इमारतीतील 135 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
Advertisement
तसेच अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी 7 : 20 मिनिटांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 24 मजल्यांवरील इलेक्ट्रिक मीटर केबिन, वायरिंग, केबल आणि इलेक्ट्रिक डक्टमधील साहित्यात ही आग लागली. तसंच, १३५ जणांपैकी २५ जणांना इमारतीच्या टेरेसवरून, ३० जणांना १५ व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून आणि ८० जणांना २२व्या मजल्यावरील आश्रयस्थानातून बाहेर काढण्यात आले.
Advertisement