पिंपरी चिंचवड :
पिंपरी चिंचवड शहरातील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लांडेवाडी, भोसरी ,पुणे 39 येथे आज रविवार दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रोजी भारतीय संविधानदिन उत्साहात साजरा करण्यात आला .
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार . विलास लांडे, संस्थेचे सचिव सुधीर मुंगसे, संस्थेचे विश्वस्त मा. नगरसेवक विक्रांत लांडे, नगरसेवक . धनंजय भालेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के .जी .कानडे, उपप्राचार्य प्रा. किरण चौधरी, रजिस्ट्रार सौ. अश्विनी भोसले, सर्व प्राध्यापक वृंद ,सर्व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . के . जी. कानडे यांनी केले . भारतीय संविधान हे जगामध्ये सर्वोत्कृष्ट आहे .घटनाकारांनी अतिशय परिश्रम घेऊन सर्वांगसुंदर राज्यघटना तयार केल्याचे मत व्यक्त केले .
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा . डॉ . विलास लांडे यांनी आपल्या मनोगतात, भारतीय राज्यघटनेमध्ये स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे महत्त्वपूर्ण असून सर्व जनतेला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे असे मत मांडले .
सर्वांसमवेत भारतीय संविधानाचे वाचन डॉ .श्रेया दाणी यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली