पिंपरी, दि. २३ ऑगस्ट २०२३:- महापालिका अग्निशामक विभागाचे वापराकरिता वॉटर कॅनन ०३ नग वाहने, फायर टेंडर ०६ नग वाहने, ऍडव्हान्स रेस्क्यु टेंडर ०२ नग वाहने खरेदी करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेल्या विविध विषयांना आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडील १८ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त खाऊ म्हणून बिस्कीट खरेदी करणेकामी आलेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या प्रभाग क्र. २ सेक्टर क्र. १६, राजे शिवाजीनगर अग्निशमन केंद्रात फर्निचर व इतर स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत कॅलिग्राफी उद्यानांमध्ये भिंती रंगवण्याबाबत, व्हर्टिकल गार्डनसाठी प्लास्टिक पॉट स्टँन्डसह साहित्य पुरविणेबाबत, नर्सरीसाठी प्लास्टिक पॉट खरेदी करणेबाबत येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
महापालिकेचे प्रभाग क्र. ५ गवळी संत तुकाराम नगर व इत्यादी ठिकाणी रस्त्यांचे हॉटमिक्स पद्धतीने डांबरीकरण करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चऱ्होली येथील १४४२ सदनिकांच्या प्रकल्पातील किचनच्या खिडक्यांना एम. एस. ग्रील बसविणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
वाय. सी. एम. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक कामे करणे, नवजात अर्भक विभागाचे नुतनीकरण करणे, डॉक्टरांचे निवासस्थान नुतनीकरण व विद्युत विषयक कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
कायदा विभागाकडील विधी अधिकारी अभिमानाचे पद एकत्रित मानधनावर हंगामी स्वरूपात ६ महिन्याच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात भरणेस मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २५ ताथवडे परिसरातील जलनि:सारण नलिकांची व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी येणाऱ्या खर्चास तसेच प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर व प्रभागातील महापालिका इमारतींची स्थापत्य विषयक देखभाल व दुरूस्ती कामे करणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर तसेच प्रभाग क्र. २६ विशालनगर व प्रभागातील इतर परिसरातील फुटपाथ आणि पेव्हिंग ब्लॉकची देखभाल दुरूस्ती विषय़क कामे करणेकामी येणाऱ्या मान्यता देण्यात आली.
मध्यवर्ती औषध/साहित्य भांडार, वैद्यकीय भांडार, मनपा रुग्णालयाकरिता हॅन्ड पॅलेट ट्रक खरेदीबाबत मान्यता देण्यात आली.
केंद्रशासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महानगरपालिकेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चऱ्होली व आकुर्डी येथे निवासी गाळे बांधणेकामी आणि प्रकल्पातील सब स्टेशनचा करारनामा शुल्क अदा करणेकामी मान्यता देण्यात आली.
अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काळभोरनगर, मोहननगर परिसरात जलनि:सारण नलिका सुधारणा विषयक कामे करणे व चेंबर्सची देखभाल दुरूस्ती करणेकामी तसेच मनपाचे प्रभाग क्र. २५ मधील पुनावळे तसेच ताथवडे परिसरात व ठिकठिकाणी रस्त्यांवरील खड्डे व चर एम. पी. एम, हॉटमिक्स व कोल्डमिक्स पद्धतीने दुरूस्ती करणेकामी मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख गावठाण, विशालनगर तसेच प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर व इतर परिसरातील रस्त्यांवरील खड्डे, ट्रेंचेस इत्यादींचा डब्लु. एम. एम, एम. पी. एम, बी. एम आणि कोल्डमिक्स पद्धतीने दुरूस्तीकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्र. २६ पिंपळे निलख येथील अनाधिकृत बांधकामे व अतिक्रमणे हटविणेकामी मशिनरी पुरविणेकामी येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर परिसरात रस्त्यांना थर्मोप्लास्ट पेन्टचे पट्टे मारणे, नामफलक बसविणे, रस्ता दुभाजकाची दुरूस्ती करणे व इतर स्थापत्य विषयक दुरूस्तीची कामे करणेस मान्यता देण्यात आली.
मनपाचे प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव व प्रभागातील इतर परिसरातील पावसाळी पाण्याच्या लाईनची दुरूस्तीची कामे करणे आवश्यकतेनुसार नवीन लाईन टाकणे व इतर स्थापत्य विषयक देखभाल दुरूस्ती कामे करणेस मान्यता देण्यात आली.
महापालिकेच्या माझी माती माझा देश या अभियानातंर्गत हर घर तिरंगा उपक्रमासाठी आवश्यक राष्ट्रध्वज पुरविणेकामी आलेल्या खर्चास मान्यता देण्यात आली.