शबनम न्युज | मुंबई
इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 च्या हंगामासाठीची लिलाव प्रक्रिया 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होणार आहे. या लिलावासाठी सर्व दहा संघाने आपली तयारी सुरू केली आहे.
यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स ने अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. शार्दुलला केकेआर ने 2023 चे लिलावामध्ये तब्बल 10.75 कोटी रुपये मोजून खरेदी केले होते. त्यामुळे शार्दुलला रिलीज केल्याने केकेआर च्या पर्समध्ये 10.75 कोटी रुपये जमा झाली आहे. गत हंगामात शार्दुल ठाकूर ने काही सामन्यात कोलकत्ता साठी मॅच विनिंग कामगिरी केली होती.
तसेच रॉयल चेन्जर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी फिरकी गोलंदाज शहाबाद अहमद आणि मयंक डागर यांना परस्परांमध्ये ट्रेंड केलं आहे. शहाबाज एस आर एच आणि मयंक आरसीबी कडून खेळेल तर इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट यांनी आयपीएल 24 मधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. रूट हा राजस्थान रॉयल्स कडून खेळतो.