शबनम न्युज | पिंपरी
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाला सज्जड इशारा, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर तात्काळ कारणे दाखवा नोटीस काढण्यात यावी, अशी मागणी सुरज गजानन बाबर (युवा नेता: शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. त्यांनी प्रसारमाध्यमांना यासंदर्भात माहिती दिली आहे.
ते म्हणाले, आज शिवसैनिक ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) व कृषी पर्यावरण शिक्षण आणि नागरी समस्या निवारण संघटनेचे पदाधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्ड यांचे उपप्रादेशिक अधिकारी श्री मंचक जाधव साहेब यांना जाऊन भेटलो तसेच कालच प्राप्त झालेल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माहिती बाबत तसेच अद्याप पिंपरी चिंचवड महानगरपालिका अजूनही कारणे दाखवा नोटीस न काढल्याने श्री जाधव साहेब यांना जाब विचारला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार आजमीतिला 595 दशलक्ष लिटर इतके पाणी जलसंपदा विभागाकडून घेण्यात येत आहे त्यापैकी 80 टक्के सरासरी म्हणजेच 359 दशलक्ष लिटर इतके सांडपाण्याची निर्मिती पिंपरी चिंचवड हद्दीमध्ये होत आहे, सध्या स्थितीमध्ये एकूण १२ ठिकाणी 363 दशलक्ष लिटर प्रतिदिन क्षमतेचे 16 महिला शुद्धीकरण केंद्र कार्यान्वित असल्याचे सांगितले आहे परंतु वास्तविकता जर आपण पाहिली तर प्रतिदिन सुमारे 300 दशलक्ष लिटर सांडपाण्यावर प्रक्रिया होत असून उर्वरित म्हणजे 59 दशलक्ष लिटर्स सांडपाणी प्रक्रिया न करता पवना, मुळा व इंद्रायणी नद्यांमध्ये सोडले ही खूप गंभीर बाब , या अप्रक्रियाकृत सांडपाण्यामुळे पाण्यातील जीवसृष्टी धोक्यात येत आहे, रोगराई पसरत आहे एकंदरीतच जलप्रदूषण होत आहे , त्याचप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने अतिरिक्त पाण्याबाबत कोणतीही परवानगी प्रदूषण नियंत्रण बोर्डाची घेतली नाही( consent) , बँक गॅरंटी बाबत कन्सेंट न घेतल्यामुळे कोणतीही स्पष्टता नाही यामुळे आम्ही श्री जाधव साहेबांना फक्त बघ्याची भूमिका घेऊ नका, प्रदूषणाकडे दुर्लक्ष करू नका अन्यथा आपल्याला गंभीर शिक्षेला सामोरे जावे लागेल वेळप्रसंगी जनआंदोलन छेडण्यात येईल त्याचप्रमाणे जनहित याचिका व हरित लवादाकडेही तक्रार केली जाईल असा सज्जड इशारा दिला आहे यानंतर श्री जाधव साहेब यांनी लवकरात लवकर आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर कारवाई करू असे आश्वासन आम्हाला दिले.यावेळी सुरज गजानन बाबर,युवा नेते(उद्धव बाळासाहेब ठाकरे) व अध्यक्ष कृषी पर्यावरण शिक्षण व नागरी समस्या निवारण संघटना, यांच्यासमवेत शिवसैनिक गणेश बाबर, योगेश राऊत,स्वप्निल शेटे,कौस्तुभ देशपांडे,परेश पटेल आदी उपस्थित होते.