- आगामी सर्वच निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी शिवसेना सज्ज
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महिला संघटन सक्षम
शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेना महिला आघाडी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुणे शहर संपर्कप्रमुख सचिन भाऊ अहिर तसेच महिला आघाडी मावळ पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख लतिका ताई पाष्टे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरात आगामी होणाऱ्या लोकसभा विधानसभा व महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची महिला आघाडी सक्षम व्हावी, या दृष्टिकोनातून महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना पक्ष हा पिंपरी चिंचवड शहरात वाढविण्यासाठी व येणाऱ्या निवडणुकांमध्ये सक्षम पणे सामोरे जाण्यासाठी या महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती या महत्त्वाच्या मानल्या जात आहेत.
शिवसेनेच्या महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्ती व पदाधिकारी जाहीर करण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी या वेळी सुलभाताई उबाळे शिरूर मतदार संघातील जिल्हा प्रमुख, शैलाताई खंडागळे पिं. चिं. जिल्हा प्रमुख, अनिताताई तुतारे पिं. चिं शहर संघटीका, सचिन भोसले पिं. चिं.शहर प्रमुख, चेतन पवार शहर प्रमुख युवा सेना पिंपरी चिंचवड शहर, युवराज कोकाटे शहर संघटक,रेखा ताई दर्शले (मा.नगरसेविका) नितीन बोंडे इत्यादी उपस्थित होते. यावेळी चिंचवड पिंपरी भोसरी मधील अनेक महिलांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश घेण्यात आला.
महिला पदाधिकाऱ्यांचे नाव व पद पुढील प्रमाणे –
भोसरी
विधानसभा संघटिका: कल्पना शेटे
समन्वयक पिंपरी: सुजाता काटे, गौरी घंटे.
विभाग संघटिका: सुजाता गायकवाड (अंजठा नगर)
उपविभाग संघटिका:
साधना वाघमारे (भोसरी)
शाखा संघटिका: वंदना बनसोडे (अंजठा नगर)
पिंपरी
*विधानसभा संघटिका:*डॉ वैशाली अभय कुलते,
समन्वयक पिंपरी चिंचवड : वैभवी घोडके
उपशहर संघटिका: कामिनी मिश्रा, सुषमा शेलार
विभाग संघटिका: संगीता भारती (संत तुकाराम नगर), पुनम रिठे (पिंपरी)
चिंचवड
विधानसभा संघटिका: मंगल भोकरे,
समन्वयक चिंचवड विधानसभा: उषा अल्हाट
उपशहर संघटिका: रंजनी वाघ, योगिनी मोहन, ज्योती भालके.
विभाग संघटिका: कमळ गोडांबे (,पिंपळे सौदागर) वंदना वाल्हेकर (वाल्हेकर वाडी), वैशाली काटकर (चिंचवड), अमृता सुपेकर (रहाटणी), गीता कुसाळकर (वाकड),
उपविभाग प्रमुख: सुनिता सोन वणे (रहाटणी),
श्रद्धा शिंदे (काळेवाडी), कलावती नाटेकर , वंदना खंडागळे (पिंपळे सौदागर)
हर्षाली घरटे (वाल्हेकर वाडी) तस्लीम शेख (काळेवाडी)