शबनम न्युज | पिंपरी
आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री संत सावता महाराज मंदिर येथे या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांना भजनी मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक अजित प्रताप बुर्डे, श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष नितीन ताम्हाणे, भाऊशेठ रासकर, सुरेश निकम, हभप वाघेश्र्वर महाराज तळेकर आदींच्या उपस्थितीत केले.
आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून भजन स्पर्धा पार पडल्या. श्री संत सावता महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने सातत्याने विविध धार्मिक, वारकरी संप्रदायाशी निगडित कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नुकतेच आमदार लांडगे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून घेतलेल्या स्पर्धेत भजनी मंडळाचा प्रतिसाद मिळाला. सहभागी मंडळाला आकर्षक बक्षीस देण्यात आले.
चऱ्होलीतील भाऊ रासकर, निखील लांडगे, दिनेश बुर्डे, रोहित भुजबळ, श्री संत सावता माळी महाराज मंदिर ट्रस्ट व श्री संत सावता महाराज किर्तन महोत्सव ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.