शबनम न्युज | पुणे
महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल रहाटणी येथे ”महापरिनिर्वान दिन” साजरा करण्यात आला. या वेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार व प्रमुख पाहुणे रुपेश चांदोरे सामाजिक कार्यकर्ते, शाळेतील पालक अजय कांबळे, दीपक जाधव, जितेश जगताप बाळासाहेब शेंडगे,सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, शाळेचे उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यानी मार्गदर्शन केले.
रुपेश चांदेरे म्हणाले, ‘’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे परमपुज्य, बोधिसत्व, महामानव, युगपुरुष, घटनापती, महाविद्वान, दलितांचे कैवारी, स्त्री उद्धारक होते. माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तास तो शिक्षणाअभावी जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम होतो, असे बाबासाहेबांचे शब्द आहेत. ”
इयत्ता पाचवी सहावी सातवी आठवी नववीच्या मुलींनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती गीत गायले आरुष हिबारे, श्रावणी साळुंखे, समृद्धी जगताप या विद्यार्थिनींनी भाषण केले व तसेच सहशिक्षिका उर्मिला ठोंबरे, रेणू राठी यांनी बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनीनीं पोवाडा गायला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेत प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका निशा पवार यांनी केले व आभार सुनंदा साळवी यांनी मानले.