शबनम न्यूज | वडगाव मावळ
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथे गुरुवार (दि. 22 )रोजी राष्ट्रवादी महिला काँग्रेस व कुलस्वामिनी महिला मंच यांच्या वतीने सन्मान महिला, कोरोना योद्धांचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार सुनील शेळके, राष्ट्रवादीचे मावळ तालुका अध्यक्ष बबनराव भेगडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कोरोना काळात ज्या महिला कोरोना योद्धानी आपले कर्तव्य जबाबदारीने निभावली. त्या सर्व महिला कोरोना योद्धांचा कार्याचा गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा सुवर्णा राऊत यांनी दिली आहे.
सदर कार्यक्रम गुरुवारी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे सकाळी 10 :30 वाजता संपन्न होणार आहे.