प्रतिनिधी | रोहित सावते
शबनम न्युज | पुणे
भीमा कोरेगाव दंगलीमधील आंबेडकरी अनुयायांवरील दंगली मध्ये झालेले गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीकरिता आज कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने ससून हॉस्पिटल जवळ पुणे स्टेशन येथे आमरण उपोषण करण्यात आले.
या उपोषणात अनेक भीम अनुयायांनी सहभाग नोंदविला. यावेळी संघाचे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते, भीमसैनिक प्रदीप थोरात, पंचशील चॅरिटेबल ट्रस्ट पुण्याचे अध्यक्ष पंकज साबळे, सनी अण्णा जाधव या सर्वांनी या आमरण उपोषणात सहभाग घेतला.
2018 मधील भिमकोरेगाव प्रकरणात घडून आलेल्या दंगली मधे अनेक आंबेडकर अनुयायांवर गुन्हे दाखल झाले होते. तेच गुन्हे मागे घेण्यासाठी दिनांक 5 डिसेंबर पासून या सर्व भीम अनुयायांनी आमरण उपोषण पतकारले आहे. तसेच भीमाकोरेगाव मधील विजय स्तंभाच्या विकास कामासाठी जो निधी उपमुख्यमंत्री अजित पवार व धनंजय मुंडे यांच्या तर्फे 2019 ला 100 कोटी मंजूर केले होते, ते आजतागायत पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे वर्ग झाले नसून रकम रुपये 100 कोटी, 200 कोटी अशी त्वरित जिल्हा अधिकाऱ्याकडे जमा करावी, अश्या स्पष्ट मागण्या आंबेडकरी अनुयायांनी उपोषणा मार्फत मांडल्या आहेत.