पिंपरी चिंचवड , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर परिसरात दिल से मिलेट या स्वादिष्ट पदार्थांची रेलचेल असलेल्या सुसज्ज रेस्टॉरंट ची सुरुवात झाली आहे . रश्मी जोशी देशमुख यांनी रश्मी किचन च्या माध्यमातून दिल से मिलेट (आउटलेट) रेस्टोरंट ची सुरुवात केली आहे. पिंपळे सौदागर सारख्या उंच राहणीमान असलेल्या नागरिकांपासून ते सामान्य नागरिकांना भावणारे असे मिलेट सुरू करण्यात आले आहे.
प्रत्येक जण आपल्या जिभेची चव भागवताना तेलकट पदार्थ जंक फूड खाऊन तसेच वडापाव, चाट सारखे पदार्थ खातात परंतु हे खाताना आपण आपल्या शरीराकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो परंतु आता चवीबरोबरच आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी चविष्ट असे विविध खाद्यपदार्थ घेऊन आपल्या शहरात शिवार चौकात दिलसे मिलेट हे रेस्टॉरंट उपलब्ध झाले आहेत.
दिल से मिलेट या नव्या रेस्टोरंट (आउटलेट) मध्ये मिलेट्स, नव्या युगाचा आरोग्यमंत्र ! मिलेट्स म्हणजे आरोग्य आणि शक्ति देणार श्रीधान्य आणि भरड धान्य ,ज्वारी, बाजरी ,नाचणी आणि मूग यासारख्या वेगवेगळ्या मिलेट्स पासून बनवलेल्या अत्यंत आरोग्यदायी आणि अतिशय रुचकर असलेल्या अनेक मिलेट्स या रेस्टॉरंटमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
आजपासून हे रेस्टॉरंट सुरु झाले आहे . 2023 हे आंतरराष्ट्रीय मिलेट वर्ष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलं त्या आव्हानाला प्रतिसाद देत रश्मी जोशी देशमुख यांनी दिलसे मिलेट या आउटलेटची सुरुवात केली आहे. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘तुष्टीबरोबरच पुष्टी’ देण्यासाठी दिलसे मिलेट हे आउटलेट शहरवासीयांच्या अगदी जवळ म्हणजे शिवार चौकात सुरू झाले आहे. नागरिकांनी एकदा तरी या रेस्टोरंट ला भेट द्यावी असे आवाहन रश्मी जोशी देशमुख यांनी केले आहे.