मावळ प्रतिनिधी :
पुणे व रायगड जिल्ह्यातील पहिल्या व्हिडीओ न्यूज बातमीपत्र मावळ वार्ताचा २२ व्या वर्धापन दिन नुकताच लोणावळा येथील कुमार रिसॉर्ट येथे कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना मावळवार्ता गौरव पुरस्कार -२०२३ देउन सन्मानित करण्यात आले. यामध्ये मावळ तालुक्यातील पुणे जिल्हाचे जेष्ठ नेते सहकारभूषण मा.बबनराव भेगडे यांच्या सामाजिक,शैक्षिणिक, राजकीय,सहकार अश्या विविध क्षेत्रातील कार्याबद्दल “जीवनगौरव पुरस्कार” देऊन मान्यवरांचे शुभ हस्ते शाल ,श्रीफळ ,स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे मा.एस.बी.पाटील मा.अप्पर आयुक्त महासचिव,मा.चंद्रमणी इंदुरकर मा.अधीक्षक येरवडा कारागृह,मा.रघुनाथ सावंत रिटायर्ड पेरा कामंडो,मा.वसंतदादा खानविलकर गुरुवर्य दादाजी,मा.सत्यसाई कार्तिक सहायक पोलिस अधीक्षक लोणावळा ,माधव अभ्यंकर सिने अभिनेते,विजय पटवर्धन सिने अभिनेते उपस्थित होते.
सदर जीवनगौरव पुरस्कार प्रसंगी सहकारभूषण बबनराव भेगडे पत्नी सौ शोभाताई भेगडे, मुलगा पुणे पीपल्स को ऑफ बँक चे तज्ञ संचालक कौस्तुभ भेगडे ,स्नुषा प्रियांका भेगडे, बंधू कामगार नेते छबुरव भेगडे ,पुतण्या पुणे महानगर नियोजन समितीचे विद्यमान सदस्य , तळेगाव दाभाडे नगरपरिषद विद्यमान नगरसेवक संतोष भेगडे यांच्यासह परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.
सदर पुरस्कार प्रदान करते समयी सुरेल अशी भक्तीमय संगीतवाणी मैफील स्थानिक कलाकारांनी सादर करून उपस्थित श्रोते यांची मने जिंकली.
यावेळी पुणे जिल्हा कॉंग्रेस आय आयचे नेते मा.किरण गायकवाड व संत तुकाराम सहकारी साखर कारखाना चे उपाध्यक्ष मा.बापूसाहेब भेगडे , लोणावळा नगरपरिषद च्या नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव यांनी सहकारभूषण मा.बबनराव भेगडे यांच्या कार्याला उजाळा दिला.
या वेळी मावळ वार्ता व मा बबनराव भेगडे यांच्यावर प्रेम करणारे विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिक उपस्थित होते.
Advertisement