शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन येथे अयोध्या येथील श्रीराम अक्षता मंगल कलश दर्शन सोहळा आणि कलश आरती संपन्न झाली. रहटणी , पिंपळे सौदागर परिसरातील १००० हुन अधिक राम भक्तांनी मंगल कलशाच्या दिव्य दर्शनाचा लाभ घेतला.
अयोध्येतून आणलेली अक्षतांची कलश यात्रा काढण्यात आली.अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात पूजा केली जाणारी अक्षतांचे भव्य मंगल कलशाचे नागरिकांनी मनोभावे दर्शन घेऊन आरती केली.
याप्रसंगी , उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे म्हणाल्या की , ” प्रभू राम हे सर्वांचे आदर्श आहेत. ते राष्ट्रनिर्माते आहेत आणि राष्ट्रीय प्रबोधनासाठी सतत प्रेरणा देणारे आहेत. जोपर्यंत आपण प्रभू श्रीरामाचा आदर्श आपल्यासमोर ठेवू तोपर्यंत आपल्या देशाला, धर्माला आणि संस्कृतीला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. त्यामुळे अयोध्येत उभारण्यात येणारे मंदिर हे केवळ राम मंदिर नसून राष्ट्रीय मंदिर आहे.”
व आपण हा दिवस एक सन म्हणून मोठ्या उत्सहात साजरा करावा.या मंगल प्रसंगी ,नगरसेविका निर्मला कुटे संस्थापक संजय भिसे , पी.के.इंटरनॅशनल स्कुल चे संस्थापक जग्गनाथ काटे , प्राचार्य धनश्री सोनवणे , राजेंद्रनाथ जसवाल , विठाई वाचनालय सदस्य आनंद हास्य क्लबचे सदस्य व परिसरातील जेष्ठ नागरिक संघाचे जेष्ठ नागरिक आणि बहुसंख्य रामभक्त भक्तिभावाने उपस्थित होते.