शबनम न्यूज : प्रतिनिधी ,
पिंपरी चिंचवड शहरातील महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या माध्यमातून लाखो लोकांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या 141 खासदारांच्या निलंबनाबाबत निषेध नोंदवण्यासाठी आंदोलन डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की भाजपाच्या या गळचेपीला जनता येणाऱ्या निवडणुकीत उत्तर देईल. यावेळी कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, समाजसेवक मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे,राजेंद्र नायर, माजी नगरसेवक गणेश भोंडवे, आम आदमी पार्टी चे शहराध्यक्ष चेतन बेंद्रे,मुख्य प्रवक्ते माधव पाटील, ओबीसी अध्यक्ष विशाल जाधव,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला अध्यक्षा ज्योती निंबाळकर, विजयकुमार पिरंगुटे, राहुल आहेर, विनोद धुमाळ ज्योती जाधव,जनाबाई जाधव, राजेश हरगुडे, योगेश सोनवणे,गणेश काळे, राजू खंडागळे, स्वप्नाली असोले आदी उपस्थित होते.