शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय डुडूळगाव, आळंदी. जि.पुणे. या ठिकाणी वाणिज्य विभाग, स्पर्धा परीक्षा विभाग व विनर इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने IBPS बँकिंग एक्झाम व MPSC मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. दिलीप बारी यांनी कार्यक्रमाची भूमिका मांडताना काळ हा कधी थांबत नाही तर काळा समवेत विद्यार्थ्यांनी क्षमता कौशल्य व विकसित केली पाहिजेत असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी विनर इन्स्टिट्यूट,पुणे व शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय,डुडुळगाव,आळंदी.यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक मा. श्री. अमित वाजे- वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक विनर इन्स्टिट्यूट, पुणे. यांनी व्याख्यानाची सुरुवात करतांना जंगलातील प्राणी हा केवळ त्याच्या आत्मविश्वासामुळेच राजा बनतो असे मत व्यक्त करून जीवनात करियर करण्यासाठी मनाची स्थिरता व सातत्य कसे महत्त्वाचे आहे या संदर्भात विविध उदाहरणाचे दाखले देत मार्गदर्शन केले. आपण आयुष्यात किती वर्षे जगतो या पेक्षा कसे जगतो याला महत्त्वाचे स्थान आहे. बँकिंग क्षेत्रात असलेली विविध पदे आणि त्या साठीचा अभ्यासक्रम कसा सुलभ असून त्याची तयारी कशी केली पाहिजे या संदर्भात पी.पी.टी.च्या माध्यमातून विनर अकॅडमी मध्ये यश संपादन केलेल्या विविध विद्यार्थ्यांच्या यशाचा लेखाजोखा मांडून जगातील एकमेव क्षेत्र असे आहे की जे कधीच बंद पडत नाही या संदर्भात विविध बँकेचा आढावा घेऊन त्यात असणाऱ्या विविध ऑफिसर च्या जागा त्यासाठी लागणारी पात्रता संदर्भात मत व्यक्त केले. कोणताही चांगला निर्णय उशिरा घेतल्यामुळे त्याचे जीवनात कसे परिणाम होतात हे विविध उदाहरणांचे दाखले देत सखोल मार्गदर्शन केले.
मा. श्री. शाम झी – सहाय्यक प्राध्यापक विनर इन्स्टिट्यूट, पुणे. यांनी बँकिंग क्षेत्रात असणारे विविध पदे, अभ्यासक्रम यासंदर्भात विवेचन करून करिअरची संधी ही विद्यार्थ्यांनी पदवीच्या अगोदर पासूनच शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जोपर्यंत आपण आयुष्यात यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न हे चालू ठेवले पाहिजे कारण प्रयत्न करणाऱ्यांना शेवटी यश निश्चितच मिळते या संदर्भातील मधुशाला हरिवंश राय बच्चन लिखित ‘ कोशिश करने वालो की कभी हार नही होती ‘ या काव्यपंक्तीचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी सध्याच्या काळात शासकीय नोकरी कशी महत्त्वाची असून त्यासाठी आपल्या अभ्यासात सातत्य ठेवण्याची आवश्यकता विशद करून भारत जॉब हे पोर्टल डाऊनलोड करण्याचे आवाहन केले. या पोर्टलमध्ये बँकिंग क्षेत्रात असलेल्या विविध परीक्षा त्यासंदर्भात तज्ञ व्यक्तींचे व्हिडिओ इत्यादी महत्त्वपूर्ण माहिती असून संबंधित माहिती विद्यार्थ्यांच्या जीवनाला वेगळी कलाटणी देईन असे मत व्यक्त करून विद्यार्थ्यांना करिअर साठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
सदर कार्यक्रमासाठी मा.श्री. अक्षय भारती – व्यवस्थापक, विनर इन्स्टिट्यूट,पुणे., मा. श्री. लक्ष्मण नवघरे- सहाय्य, विनर इन्स्टिट्यूट, पुणे., प्रा. कैलास अस्तरकर,प्रा. शाहूराज येवते,डॉ. छाया जोशी, प्रा. रोहित कांबळे,प्रा. सविता मानके, प्रा. दिपाली ताम्हाणे, प्रा. दिपाली सोनवणे,प्रा. यशोदा आनेराव, प्रा. सोनाली अभंग, प्रा. पूजा मिटकरी,प्रा. प्रेरणा पाटील, प्रा. माधवी चौधरी, प्रा. पूजा खवले, श्री प्रवीण भावे – कार्यालयीन प्रमुख,सौ. वर्षा ताजणे, कु. नेहा लांडगे, श्री. अरविंद फलके, श्री. वैभव बडवे इत्यादी विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व महाविद्यालयातील विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती बुऱ्हाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. समीना मोमीन यांनी मानले व कार्यक्रमाची सांगता सामुदायिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.