शबनम न्युज : 29 डिसेम्बर (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरणा संबंधित असलेली निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम लवकरात लवकर सुरू करावे या मागणी चे निवेदन माजी नगर सेवक शत्रुघ्न काटे यांनी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या कडे निवेदन द्वारे केली आहे.
सदर निवेदनात माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी कुणाल आयकॉन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली.आहे आपल्या लेखी निवेदनात शत्रुघ्न काटे यांनी नमूद केले आहे कि शहरातील प्रभाग क्र.२८ हे स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. परंतु या प्रभागातील प्रमुख रहदारीचा रस्ता असलेला कुणाल आयकॉन रोड हे स्मार्ट सिटी अंतर्गत वगळण्यात आलेला आहे. दिवसेंदिवस सदर रस्त्याची होत चाललेली दुरवस्था ही चिंतेची बाब असून नागरिकांच्या अपघाताचे प्रमाणात देखील लक्षणीय वाढ होत आहे. यावर प्रशासनामार्फत नेहमी तात्पुरते उपाय म्हणून डागडुजी करण्यात येते परंतु ते देखील काही काळानंतर पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती होते.
कुणाल आयकॉन रस्ता काँक्रीटीकरण करण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र सध्या दिसत आहे. सदर रस्ता विकसित करण्यासाठी केली जाणारी निविदा प्रक्रिया पूर्णपणे रखडलेल्या स्वरूपात असून याबाबत कुठलेही सकारात्मक प्रतिसाद पालिके मार्फत मिळत नसल्याची भावना निर्माण झाली आहे.
म्हणून प्रभागातील कुणाल आयकॉन रस्ता लवकरात लवकर विकसित करण्याचा दृष्टीने सकारात्मक विचार करीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून रस्त्याचे काँक्रीटीकरण काम सुरू करावे ही अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.