शबनम न्युज : 29 डिसेम्बर (प्रतिनिधी) पिंपरी चिंचवड :-
पिंपरी चिंचवड शहरातील माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी प्रभाग क्र.२८मधील बहुउद्देशीय मैदान विकसित करण्याची मागणी मनपा आयुक्त शेखर सिंह यांच्या कडे केली आहे .
आपल्या या लेखी निवेदनात माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR ची मोकळी जागा विकसित करण्याची मागणी केली आहे. प्रभाग क्र.२८मध्ये असलेल्या HCMTR जागेत कोकणे चौक ते स्वराज चौक दरम्यान २ किमी लांब असे शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन तसेच विविध प्लाझा विकसित करण्यात आले आहे. याच शिव छत्रपती लिनिअर अर्बन गार्डन दरम्यान असलेल्या पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली ४६३ मी.लांब असलेल्या क्षेत्रापैकी ९५% जागा ताब्यात असूनही अद्याप विकसित करण्यात आलेली नाही. स्मार्ट सिटी अंतर्गत सदर जागेत आपण BMX पार्क विकसित करणार होतो परंतु या BMX पार्कचा फारसा वापर या प्रभागात होणार नसल्याचे दिसून आले.शहरात इतर दुसऱ्या ठिकाणी आपण BMX पार्क विकसित करण्याचा विचार करू शकतो.सदर जागा समतल प्रकारची असून याचा संपूर्ण उपयोग बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी केल्यास नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल असे मत शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले.
पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस वाढत असलेली नागरी लोकवस्तीचा विचार करता नागरीकांच्या सुखसुविधेच्या उपाययोजना करणे क्रमप्राप्त ठरते.अश्या परिस्थितीत सदर जागेचा उपयोग आपण बहुउद्देशीय टर्फचे मैदान किंवा ट्रीमिक्स पद्धतीने मैदाने विकसित करण्यासाठी करू शकतो जेणेकरून याचा लाभ परिसरातील नागरिकांना घेता येईल. यासाठी विविध सुखसुविधा असलेली बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी एक चांगल्या आर्किटेक्टची नेमणूक करण्यात यावी जेणेकरून सदर जागेचे पूर्ण नियोजन बद्ध आराखडा तयार करून एक बहुउद्देशीय मैदान नागरिकांसाठी विकसित करता येईल.
पी के चौक ते गोविंद यशदा चौक दरम्यान असलेली HCMTR च्या मोकळ्या जागेत बहुउद्देशीय मैदान विकसित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी आपल्या लेखी निवेदनाद्वारे पालिका आयुक्त यांच्याकडे केली आहे.