शबनम न्युज
पिंपरी चिंचवड मनपाच्या क्रीडा कला
विकास प्रकल्प कबड्डी संघाच्या
भूमिका गोरे व प्रतीक्षा लांडगे यांची दि. १/२०२४ते३१/१/२०२४ दरम्यान तामिळनाडू येथे होणाऱ्या सहाव्या राष्ट्रीय खेलो इंडिया कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे .या दोघीही गतवर्षीच्या पाचव्या खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत्या .गतवर्षी महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले होते. सलग दुसऱ्यांदा त्यांना खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत असल्याने त्यांचे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे खासदार मावळ ,श्री महेश दादा लांडगे आमदार भोसरी ,श्री मिनिनाथ दंडवते उपायुक्त क्रीडा, श्रीमती अनिताताई केदारी क्रीडा अधिकारी ,श्री परशुराम वाघमोडे प्रशासनाधिकारी, श्री बाबासाहेब राठोड मुख्याध्यापक माध्यमिक विद्यालय थेरगाव ,श्री दीपक कन्हेरे क्रीडा पर्यवेक्षक यांनी विशेष अभिनंदन करून पुढील स्पर्धेस शुभेच्छा दिल्या. सदर खेळाडूंना श्री बन्सी आटवे क्रीडा पर्यवेक्षक,श्रीमती सोनाली जाधव राष्ट्रीय खेळाडू यांचे मार्गदर्शन लाभले आहे