शबनम न्युज | पिंपरी
‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमातील ‘पहचान कौन’ या अभिनयासाठी ओळखला जाणारा कॉमेडियन म्हणजे नवीन प्रभाकर. स्टँडअप कॉमेडी असो किंवा गायन, अभिनय असो नेहमीच नवीन ने प्रेक्षकांना मनमुराद आनंद दिला आहे. तसेच ‘बॉम्बे टू गोवा’, ‘खिलाडी 786’ आणि ‘फाटा पोस्टर निखला हिरो’ यांसारख्या अनेक बॉलीवूड चित्रपटात तसेच ‘सोहम’ ‘ आपडी थापडी’ आदी मराठी चित्रपटात देखील त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता हा कॉमेडी किंग पुणेकरांना हसवायला येत आहे.
आर. एम इव्हेंट्स आणि मोना सिंग यांच्या वतीने कॉमेडी किंग नवीन प्रभाकर याचा ‘कॉमेडी लाफ्टर नवीन प्रभाकर कॉमेडी नाईट्स’ हा विनोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या १४ जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड येथील एलप्रो सिटी स्क्वेर मॉल येथे, सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये नवीन सोबत ‘भाबिजी घर पर हे’ फेम प्रेम चौधरी आणि ‘वेंत्रिलो क्युस्ट’ मधील राजकुमार रॅन्चो या दोघांचा देखील सहभाग असणार आहे. त्यामुळे विनोदाचा आनंद द्विगुणिक होणार यात शंका नाही.