शबनम न्युज : पुणे
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ.पतंगराव कदम यांच्या जयंतीनिमित्त भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजने ‘डॉ. पतंगराव कदम स्मृती सार्वजनिक व्याख्यानमाला – २०२४’ अंतर्गत ‘यूनिफार्म सिव्हिल कोड व मुस्लिम लॉ ‘ या विषयावर केंद्रीय गृह मंत्रालयाचे वरिष्ठ सल्लागार एड.अमर (इम्तीयाज) शहाबुद्दीन मुल्ला यांचे व्याख्यान आयोजित केले. भारती विद्यापीठ विधी विद्याशाखेच्या अधिष्ठाता आणि न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य डॉ. उज्ज्वला बेंडाळे, उपप्राचार्य डॉ. ज्योती धर्म, आय.क्यू.ए.सी. को- ऑर्डिनेटर डॉ. विद्या ढेरे, फॅकल्टी को- ऑर्डिनेटर डॉ. रोहित सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली हे व्याख्यान नुकतेच पार पडले.भारती विद्यापीठाच्या एरंडवणे शैक्षणिक संकुलात झालेल्या या व्याख्यानाला प्राध्यापक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.