शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या चिंचवड वसाहतीतील कायनेटीक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्यूशन लिमिटेड या इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस भेट देवून वाहनांची माहिती घेतली.
यावेळी पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर, कंपनीचे अध्यक्ष पद्मश्री अरुण फिरोदिया, कार्यकारी संचालक अजिंक्य फिरोदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी सुलेजा फिरोदिया आदी उपस्थित होते.
पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, उत्पादन कालावधी, चार्जिंग कालावधी आदी माहिती जाणून घेतली. ते म्हणाले, इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असून भविष्यात इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल.
पर्यावरण मंत्री ठाकरे यांच्या हस्ते कंपनी आवरात वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे
पर्यावरणाचा संतुलन राखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे ही काळाची गरज असून भविष्यात नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात या वाहनाचा वापर करणे पर्यावरणाच्यादृष्टीने उपयुक्त ठरेल,असे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
ठाकरे यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन खर्च व कालावधी, वाहनाचा दर्जा, बॅटरी क्षमता, चार्जिंग कालावधी, नवीन तंत्रज्ञानावराधारीत बस निर्मिती आदी माहिती घेतली. वाहन निर्मितीबाबत समाधान व्यक्त करून ते म्हणाले, मुंबई, पुणे यासारख्या महानगरात इलेक्ट्रिक वाहनाचा वापर करणे काळाची गरज आहे. नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन उत्पादन करणेदेखील तेवढेच महत्वाचे आहे. लांब व जवळच्या पल्याचे अंतर लक्षात घेवून आसन क्षमतेची व्यवस्था करावी. इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपनीस शासन प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी सांगितले.