शबनम न्यूज,प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शरद क्रीडा महोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेमध्ये भव्य अशी नृत्य स्पर्धा सोमवार दिनांक 15 जानेवारी रोजी चिंचवड येथील एल प्रो सिटी मॉल येथे सकाळी 11 ते 6 या वेळेत
Advertisement
आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जास्तीत जास्त पिंपरी चिंचवड करांनी हजेरी लावावी असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख यांनी केले आहे.