शबनम न्यूज , आळंदी :
फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन तर्फे आज रस्ता सुरक्षा अभियान घेण्यात आले याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक वंदना डावरे ,म फिटवेल गॅसकिट मोबिलिटी कंपनीच्या डायरेक्टर सत्वशीला शिरोळे सर्व कर्मचारी आणि ऑफिस कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी टेल्को मटेरियल गेट येथील जवळच्या अनेक कंपन्यांमध्ये वाहतूक सुरक्षा विषयी अभियान घेण्यात आले. यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांनी पुढील काळात माझे कर्मचारी माझी जबाबदारी या अभियानाद्वारे वाहतूक नियमाचे अभियान राबविणार असल्याचे सांगितले आणि अनेक कंपन्यांमध्ये हेल्मेट विषयी जनजागृती करणार असल्याचे सांगितले सर्व कर्मचारी वर्गाला वाहतुकीचे नियमा कसे पाळावे आणि फक्त गाड्या न घेता गाड्यांचे नियम सुद्धा जाणून कंपनीमध्ये येता जाता स्वतःच्या आयुष्याची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.
तसेच पोलीस उपनिरीक्षक वंदना डावरे यांनी टू व्हीलर फोर व्हीलर वाहतुकीचे सर्व नियम नियम तसेच नियम मोडल्यास कोणत्या प्रकारे दंड आकारले जातात सर्व लोकांनी वाहतूक नियमांचे कसे पालन करावे आणि वाहतुकीच्या विविध नियमांचे मार्गदर्शन केले यावेळी फिटवेल गॅस किट मोबेलिटी कंपनीचे डायरेक्टर सत्वशीला शिरोळे यांनी पोलीस उपनिरीक्षक डावरे, इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष श्री अभय भोर आणि सर्व कर्मचारी वर्गांचे आभार व्यक्त केले.