शबनम न्युज | पुणे
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे रविवार 21 जानेवारी 2024 रोजी एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे मुलांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सुमारे 850 ते 900 मुलांनी सहभाग घेतला होता.
एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन तर्फे दर वर्षी प्रमाणे यंदा हि चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा स्पर्धेचे आयोजन केले गेले असून या स्पर्धेत प्रवेश निशुल्क होते. 5-10 वर्षे मधील गटातील स्पर्धकांसाठी माझे आवडते टॉय, बलून मॅन रात्रीचे आकाश, तर 11-15 वर्षे गटातील स्पर्धकांसाठी पाणी वाचवा, क्रीडा दिवस, जंगल हा विषय देण्यात आला होता. पुणे शहरातील विविध भागातील शाळेतील सुमारे 850 ते 900 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता. सुरेश पिंगळे (मानद सचिव, एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन), अनुपमा बर्वे (मानद सहसचिव) यशवंत खैरे (मानद सचिव) उपस्थित होते, तर एम्प्रेस गार्डन मित्र परिवाराचे रागिणी कक्कर, निवेदिता वाडेकर यांनी पर्यवेक्षकाचे कांम पाहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना पुष्प प्रदर्शनाच्या समारोपाच्या म्हणजेच 28 जाने. 2024 रोजी बक्षिस वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सुरेश पिंगळे यांनी दिली.