शबनम न्युज | मुंबई
खेळाडू ऋतुराज गायकवाड सध्या क्रिकेट पासून दूर आहे. अफगाणिस्तान आणि इंग्लंडच्या विरुद्धच्या मालिकेसाठी त्याला भारतीय संघात स्थान मिळाले नाही, मात्र त्याची पत्नी उत्कर्षा पवार महाराष्ट्राच्या संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कर्षा महाराष्ट्राच्या संघाकडून खेळत आहे.
सध्या महिला सिनिअर एक दिवसीय ट्रॉफीची स्पर्धा खेळवली जात आहे. काल महाराष्ट्र आणि उत्तराखंड यांच्यात लढत झाली. मात्र, महाराष्ट्राला पराभवाचा सामना गमवावा लागला. सामान्यात उत्कर्षा पवारने महाराष्ट्रासाठी अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या आठ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 24 धावा देत एक बळी घेतला.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना उत्तराखंडने निर्धारित 50 षटकांत 7 बाद 201 धावा घेतल्या. सलामवीर पुनम रावतने 51 धावांची खेळी केली, तर कांचन परिहारने 79 चेंडूत 60 धावांची उत्कृष्ट खेळी केली.
उत्कर्षाने 3.00 च्या सरासरीने गोलंदाजी करून सर्वांचे लक्ष वेधले, तिच्या अप्रतिम गोलंदाजी नंतरही महाराष्ट्राला या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. उत्कर्षाचा एक फोटो तिच्या पती ऋतुराज गायकवाडने शेअर केला आहे. त्यामध्ये ती गंभीर दिसत आहे.