शबनम न्युज | लोणावळा
मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात मोठी घोषणा केली आहे. मुंबई पोलिसांनी आझाद मैदानावर मराठा आरक्षणाच्या आंदोलकांना परवानगी नाकारल्यानंतरही जरांगे पाटील यांनी लोणावळ्याकडून मुंबईला जाण्यास सुरुवात केली आहे. यावेळी आपण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत ते मुंबईला निघाले आहे.
ते म्हणाले, मी नोटीसीवर सही केली. कोर्टाची होती म्हणून केली आहे. माझे नाव कसे असे विचारले असता, तुम्ही प्रमुख म्हणून तुम्हाला नोटीस दिल्याचे सांगितले. काही हरकत नाही. मी आता मुंबईला निघालो आहे. आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही, मी सरकारला मदत करणार आहे. मार्ग बदलला असेल, तर मी अडवणूक करणार नाही. आम्ही त्या मार्गाने जाऊ असेही जरांगे पाटील म्हणाले.
Advertisement