शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड शहरातील थेरगाव परिसरातील समाजसेविका .सौ.करिश्माताई सनी बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध लोकउपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत दि.2 फेब्रुवारी ते ५ फेब्रुवारीपर्यंत
मोफत स्मार्ट कार्ड अभियान,नवीन नोंदणी सुरु करण्यात आले असून त्वरित स्मार्ट कार्ड बनवून देण्यात येणार आहे.आयुष्यमान भारत कार्डअंतर्गत ५ लाखाचा हेल्थ विमा योजना राबविण्यात येत आहे. या मध्ये ज्या नागरिकाचे रेशन कार्ड मध्ये नाव आहे व ज्या नागरिकांचे रेशनिगकार्ड चालू आहेत्यांचे त्वरित आयुष्यमान कार्ड कडून मिळणार आहेत तसेच ई श्रम कार्ड (फक्त असंघटित कामगारांसाठी २ लाख अपघाती विमा आणि वयाची ६० वर्षांनंतर सरकार कडून पेन्शन) याच बरोबर आधार कार्ड चे स्मार्ट कार्ड ( मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक ) व मतदान कार्ड चे स्मार्ट कार्ड ( सोबत मो. नंबर, जुने मतदान कार्ड घेऊन येणे) याउपक्रमांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सौ. करिश्माताई सनी बारणे यांनी केले आहे तसेच अधिक माहितीसाठी •समाजसेविका सौ.करिश्माताई सनी बारणे जनसंपर्क कार्यालय ढगे बिल्डींग शेल पेट्रोल पंप शेजारी गुजर नगर थेरगाव. (८६००२०१२१२) या क्रमांक वर संपर्कसाधण्या चे आवाहन करण्यात आले आहे.