शबनम न्युज | पिंपरी
शैक्षणिक परिसर, वस्तीगृह, ग्रंथालय, उपाहारगृहे ऑनलाईन शिक्षणामुळे सायबर सुरक्षा याबाबत पुरेशी उपाय योजना आणि सुरक्षिततेबाबत कठोर नियम करावे, अशी मागणी दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर यांनी आज गृहराज्य मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात त्यांनी म्हंटले आहे कि, महाविद्यालयीन विद्यार्थिनींना आणि शालेय विद्यार्थिनींना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता आले पाहिजे, यासाठी सर्व विद्यापीठ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहेच. परंतु त्याचबरोबर शासनाने देखील गांभीर्याने लक्ष देऊन शैक्षणिक परिसर परिसरात उपाययोजना करणे आवश्यक आहे. पिंपरी चिंचवड परिसरात विद्यार्थिनींच्या विनयभंगाचे छेडछाडीचे किडनॅपिंगचे तसेच विद्यार्थिनींवर हल्ला करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. विद्यार्थिनींच्या तक्रारी आल्यानंतर त्यांना तात्काळ प्रतिसाद देऊन सहानभूतीपूर्वक न्याय दिला पाहिजे. अनेक वेळा तक्रारींकडे दुर्लक्ष केले जाते, त्याचे विपरीत परिणाम होतात अनेक वेळा महिला विद्यार्थिनी धाडसाने पुढे येत नाही त्यासाठी एक समिती गठन करून त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या समस्या मनमोकळेपणे सांगू शकतील. या समितीमध्ये प्राध्यापक, महिला, प्रशासकीय अधिकारी, स्थानिक पोलीस प्रशासनातील प्रतिनिधी सायबर संबंधातील प्रतिनिधी अशी सर्वसामाक्ष समिती असावी, अशी मागणी दुर्गा भोर यांनी केली. यासाठी शक्ती कायदा आहे. परंतु त्याची अजूनही अंमलबजावणी केली जात नसल्याची खंत दुर्गा भोर यांनी व्यक्त केली.